Ticker

6/recent/ticker-posts

आंधळगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. गायिका नीलकमल गोंडाने यांचा जाहीर सत्कार.




चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे दिनांक - 9 मार्च 2026 रोज सोमवारला 11 वाजता पो वराई सभागृह आंधळगाव जिल्हा भंडारा. जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा अध्यक्षा- पंचायत समिती सदस्य दुर्गा बुराडे, उपस्थित होत्या,  कार्यक्रमाचे उद्घाटक - बाल विकास कल्याण सभापती अनिता न ल गोपुलवार यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुणे म्हणून - जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, ग्रामपंचायत सरपंच - महेश गभणे, तंटा  मुक्ती अध्यक्ष - पुरुषोत्तम बुराडे, एस बी भलावी, सुनील बावणे, विकास चव्हाण, सुनील गोखले, संजू मते, नरेश दिवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य - नीलकमल गोंडाणे, भा गवंती शेंद्रे, बबीता निनावे, कल्पना महाल गावे, पल्लवी कुकडे, कल्पना बडवाईक, मंगला कांबळे, प्रमिला बुराडे, दुर्गा समरीत, इत्यादी उपस्थित होते. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्त्या, अबोध भजन मंडळाचा सुप्रसिद्ध गायिका नीलकमल गोंडाने यांच्या सामाजिक सांस्कृतिक कार्याची  भरीव दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला गावातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या