Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय प्रशिक्षणात शालिनी राऊत सन्मानित


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-समग्र शिक्षण अभियान गट साधन केंद्र पंचायत समिती साकोली अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यवसाय शिक्षण या उपक्रमांतर्गत व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर २ दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण नवजीवन विद्यालय जमनापूर येथे आयोजित करण्यात आले. यात साकोली गणेश वॉर्ड येथील जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा येथील क्रमांक १ येथील सहाय्यक शिक्षिका शालिनी राऊत यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद भंडारा व ओपन लिंक्स फाउंडशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. विनोबा ॲपच्या माध्यमातून शिक्षकांना एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळत असते. या माध्यमातून शाळा स्तरावर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची देवाणघेवाण या माध्यमातून करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारी महिन्यात भंडारा जिल्हयातील साकोली तालुका स्तरावरील 'पोस्ट ऑफ द मंथ' विजेते शालिनी राऊत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साकोली यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार साकोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विजय आदमने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर नवजीवन विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. लोकनंद नवखरे, भंडारा येथील विणोबा प्रोजेक्ट अधिकारी प्राची तुमसरे, उमरी येथील मुख्याध्यापक हेमराज भाजीपाले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या