चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-साकोली जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक १ ने पुन्हा एकदा तालुक्यात नावलौकिक केलेले आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या भारतीय ज्ञान संस्कृत परीक्षेत इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी टीश्या गिरधारी कापगते हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. २०२५-२६ या सत्रात गायत्री शक्ती विद्यापीठ अंतर्गत ही परीक्षा घेण्यात आलेली होती. या यशाबद्दल १५ मार्च रोजी गायत्री शक्तीपीठ येथील मान्यवरांच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम हटवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विद्यार्थ्यांच्या समोर टिशा हिचा शाळेच्या वतीनेही गौरव करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत भारद्वाज, समस्त पदाधिकारी तथा शाळेतील शिक्षक शिक्षिका वृंद तुलसीदास पटले, चेतन बोरकर, ज्ञानेश्वर माहुरले, शालिनी राऊत, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा ओटी, सुनीता गहाणे, आरती कापगते प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या