Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अर्जुन नगर,काटोल येथे उत्साहात साजरी.


 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
काटोल  : दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी  महामानव  डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्जुन नगर काटोल येथे रमाई महिला मंडळ यांच्या तर्फे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.जयंती निमित्याने आमंत्रित काटोलच्या नगरध्यशा  अर्चना देशमुख तसेच नगर परिषदेच्या बालकल्याण उपसभापती मा, लता कडू, सुभाष  कोठे, पेंदाम ताई यांच्या हस्ते विश्वाला शांतीच्या संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मोठया प्रमाणात बुद्ध उपासिका उपासक युवक वर्ग उपस्थित होते.तसेच छोट्या मुलांचा सांस्कृतिक बुद्ध भीम गीतावर आकर्षक डान्स प्रोग्राम झाला. त्या नंतर दुसऱ्या दिवशी  रमाई महिला मंडळ कडून भोजन दानाचाकार्यक्रम पार पडला. आयोजक रमाई महिला मंडळ जोत्स्ना धवराल,आशाताई मेंढे,मंगला ढोणे, लता जाधव, कल्पना चक्रपाणी,वैशाली ढोणे, अनिता ढोणे,प्रेमीला जांभुळकर, वंदना सरदार,निर्मला मेश्राम, अनिता कांबळे,सविता नाईक, निर्मला ढोके, शशिकला सृनगारे, कांता धवराल, विमल दाभाने, जय माला मनोहरे, रोशनी सोमकुवर, विमल खोब्रागडे, रूपाली गजभिये,अशा भरपूर महिलांनी सहभाग घेऊन जयंतीचा आनंद मोठया उत्साहात पार पडला. समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या