Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा पोलीस मध्ये निवड झाल्याबध्दल कु.अर्चना तेजे व समिक्षा हनमंते यांचा सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : ध्येय,जिध्द आणि चिकाटी असली तर माणूस यशा पर्यंत नक्किच पोहचते.पण माणसाची ध्येय मोठी पाहिजेत.कारण लहान ध्येय माणसाला लहान विचारात अडकवतात. म्हणुन माणसाची ध्येय  मोठी पाहिजेत कारण तिच त्याला सामान्येतून वेगळ करतात.

मारेगाव तालुक्यातील जिल्हा  यवतमाळ येथील  कु़.अर्चना भैय्याजी तेजे व समिक्षा      हनमंते  या सर्वसाधारण  गरीब घराण्यातील मुली आहे. यांचे वडिलांचे छोटेसे सलुन दुकान आहे. आणि आई गृहिणी असुन  मोलमजुरी करता. या दोन्ही मुलींनी मोठे स्वप्न डोळ्या समोर     ठेवुन दिवस - रात्र एक करून अफार मेहनत करून शेवटी नोकरीला आपल्या पदरी पाडलं  यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस मध्ये भरती देऊन आज पोलिस खात्यात यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा व मारेगाव तालुका शाखा वणी च्या वतीने वणी चिखलगाव येथील कुमारी अर्चना भैय्याजी तेजे यांच्या निवासस्थानी  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला कुमारी समीक्षा हनमंते रा़. हिवरी नवरगाव मारेगाव तालुका येथे जाऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

आपल्या नाभीक समाजासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. की आपल्या वणी आणी मारेगाव  तालुक्यातील पहील्यांदाच आपल्या समाजाच्या मुली पोलीस मध्ये लागल्या ही मोठी  आनंदाची गोष्ट असल्याचे महाराष्ट्र नाभिक महामंळ यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत नक्षिणे यांनी यांचे भरभरुन कैतुक करत यांचा  शाल श्रीफळ देऊन सत्कार करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी  महाराष्ट्र नाभिक महामंडळ वणी येथील बबनराव वाटेकर सरपंच निवली, सलुन तालुका अध्यक्ष चंद्रकांत नक्षीने सलुन शहर अध्यक्ष जितेंद्र घुमे प्रितम भाऊ हनमंते वणी युवा शहर अध्यक्ष प्रज्वल नागतुरे तेजस नक्षिणे मारेगाव येथील अजय धांडे युवा तालुका अध्यक्ष आकाश जांबुळकर युवा शहर अध्यक्ष शंकर भाऊ शेट्टे मारेगाव शहराध्यक्ष मारेगाव तालूका अध्यक्ष मनोज भाऊ चौधरी व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई नक्षिणे अभय नागतुरे दीलीप वनकर विठ्ठल हनुमंते व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे उपस्थित होते. 

येत्या येणाऱ्या 2027 मध्ये        राज्यस्तरीय वधु- वर परिचय मेळाव्यात यांचा जाहिर सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या