Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम 16 एप्रिल 2026 सुवर्ण नगर,उत्तर नागपूर येथे आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 व्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम गीतांचा सादरीकरण.

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
रामटेक  :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती उत्सव समिती, सुवर्ण नगर,उत्तर नागपूर द्वारा आयोजित. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 व्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक 13 एप्रिल ते 17 एप्रिल 2026 पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला रामटेक तालुक्यातील किरणापुर  येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या संपूर्ण संच, बुद्ध भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम दिनांक - 16 एप्रिल 2026 रोज गुरुवारला सायंकाळी 7 ते 10:30 स्थळ- सुवर्ण नगर, समाज भवन, उत्तर नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते सुनील धम गाये, सुरेश महाजन, समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, तरी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रा हावे  असे आवाहन प्रबोधनकार भीम शाहीर  प्रदीप कडबे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या