Ticker

6/recent/ticker-posts

टॉय कारमधून दहशतीचा कट! दिल्लीत साखळी स्फोटांची योजना उधळली; महाराष्ट्रासह 3 राज्यांतून 4 जण अटकेत


दिल्ली:-राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा गंभीर कट उघडकीस आला असून, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेळेत धडक कारवाई करत हा डाव हाणून पाडला आहे. खेळण्याच्या कारमध्ये आयईडी (IED) स्फोटके लपवून साखळी स्फोट घडवण्याची धक्कादायक योजना आखण्यात आली होती.
या प्रकरणात महाराष्ट्रासह तीन वेगवेगळ्या राज्यांतून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींची नावे मोसैब अहमद, मोहम्मद हम्माद, शेख इमरान आणि मोहम्मद सोहेल अशी असून, हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते.
विशेष म्हणजे, आरोपी सामान्य नागरिकांप्रमाणेच राहत होते. कोणी ऑटो मॅकेनिक, कोणी प्लंबर तर कोणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या हालचालींबाबत कोणालाही संशय आला नव्हता.
तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलमधील चॅटमधून धक्कादायक माहिती उघड झाली. दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांसह राम मंदिर (अयोध्या), भारतीय संसद आणि काही लष्करी स्थळे त्यांच्या निशाण्यावर होती.
पोलिसांनी आरोपींकडून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, खिळे आणि रिमोट कंट्रोल टॉय कार जप्त केली आहे. तसेच, लाल किल्ला आणि इंडिया गेट परिसराची रेकी केल्याचेही समोर आले आहे.
प्राथमिक तपासानुसार, आरोपी कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित असल्याचे निष्पन्न झाले असून, मोठ्या प्रमाणावर हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या