साकोली येथील उपविभागीय पोलीस पथकाची कारवाई
२५ लाख ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
टिप्पर चालक,मालक व क्लिनरवर गुन्हा दाखल
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा: पांलादुर पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकीवर कारवाई करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय साकोली येथील पोलिस कर्मचारी तोंडी आदेश घेऊन पट्रोलिंग करीत असताना एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.३१ एफ.सी.५३४४ ने चुलबंद नदीच्या पात्रातून विना परवाना विना पास रेतीची अवैद्य वाहतूक करतांना शनीवारी
(ता.१८एप्रिल) रोजी दुपारी ०२.१० वाजता दरम्यान मिळून आल्याने टिप्पर चालक,क्लिनर व मालक यांच्यावर पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत
२५ लाख ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये टिप्पर मालकासह चालक प्रशांत मनोहर वाकडोत (३५वर्ष) रा.तिरोडा जि.गोंदिया
विक्रम भारत डहाट
(वय ४० वर्ष)
रा.तिरोडा ता.जि.गोंदिया असे आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता पोलिस विभागाला आदेश निर्गमित केले आहेत.त्यानुसार जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांची पेट्रोलिंग अहोरात्र सुरू आहे.शनिवारी दुपारच्या सुमारास पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तई गावाजवळ याच पथकातील पोलीस कर्मचारींनी पेट्रोलिंग दरम्यान शनीवारी १८ एप्रिल रोजी दुपारी २.१० वाजता दरम्यान टिप्पर चालकास २५ लाख रुपये किंमतीच्या टिप्परसह ३६ हजार रुपये किंमतीची ६ ब्रास रेती असा एकूण २५ लाख ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावरून जप्त करून अवैध व विना परवाना विना पास रेती वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवितांना मिळून आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पथकातील
पो.शि.लोकेश पांडुरंग कोटवार
यांच्या फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी टिप्पर चालक, मालक व क्लिनर या तिघांविरुद्ध अपराध क्रमांक
९९/२०२६ कलम ३०५(ई),३(५)४९भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सतीश बनसोड यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गिरीधर पेंदोर करीत आहे.


0 टिप्पण्या