चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : "पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी झटणारी व त्यांच्या कुटुंबीयांना नियमाप्रमाणे लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणजे "व्हॉईस ऑफ मीडिया" होय. आज भारत देशात ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्यगण असलेली जागतिक पातळीवरील या संघटनेत सर्व क्षेत्रातील पत्रकारांनी सामिल व्हा असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी केले. काल ( गुरु. १६ एप्रिल ) ला साकोली तालुक्यातील पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यात लाखनी व साकोली येथील कार्यकारिणीची लवकरच घोषणा करण्यात येणार असे शशिकांत भोयर यांनी सांगितले.
या महत्त्वाच्या बैठकीला अतिथी म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर, पत्रकार डी. जी. रंगारी, भंडाराचे पत्रकार शामकुंवर हे उपस्थित होते. यादरम्यान जिल्हाध्यक्ष भोयर यांनी सांगितले की, ही आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे सर्वच प्रसारमाध्यमे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पत्रकार, रिपोर्टर, प्रतिनिधी, सोशल मिडीयाचे युट्यूब चैनल, पोर्टल व इतर प्रसारण करणा-या व त्यात काम करणाऱ्या पत्रकारांना एक खुला मंच उपलब्ध करून देण्यात व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना यशस्वी ठरली आहे. समोर पत्रकारांच्या मुलांना एमपीएससी व यूपीएससीचे मोफत शिक्षण, विमा, बस पास, पत्रकारांना पेन्शन, मुलांना विदेशातील शिक्षण या प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा ही संघटना सातत्याने लढा देत आहे. म्हणून सर्व क्षेत्रातील पत्रकारांनी, सोशल मिडीयावरील आजचे युवा तरबेज रिपोर्टर तथा प्रतिनिधींनी या आंतरराष्ट्रीय संघटनेत सामील व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा अध्यक्षांनी साकोली तालुक्यातील सर्व पत्रकारांचा संवादातून परीचय मिळवून घेतला व नोंदणी केली. आणि लवकरच जिल्हा स्तरावरून एक कार्य बैठक घेऊन लाखनी व साकोली तालुक्यातील नविन कार्यकारिणी अवघ्या दिवसात घोषित केले जाईल असेही ते म्हणाले.
व्हॉईस ऑफ मीडिया या साकोली बैठकीला याप्रसंगी सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल नेटवर्किंग मिडीयाचे पत्रकार व प्रतिनिधींनी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांचे व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत अभिनंदन केले. यावेळी बैठकीला दैनिक सकाळच्या मनिषा काशिवार, युवाराष्ट्र दर्शन चे आशिष चेडगे, नवराष्ट्र चे किशोर रंगारी, देशोन्नती चे ताराचंद कापगते, न्यूज मराठी चे यशवंत कापगते, दै. महासागर चे शाहेद कुरैशी, नवभारत चे सुनिल जगिया, पुरोगामी संदेश चे किशोर बावणे, दि लोकल व्हॉईस चे अयुब खान, साकोली वार्ता चे राकेश भास्कर, सा. आकाशतरंग चे रवि भोंगाणे, नवराष्ट्र चे ऋग्वेद येवले, लोकमान्य मराठी न्यूज चे साहिल रामटेके हे प्रामुख्याने उपस्थित होते. आभार प्रदर्शन मनिषा काशिवार यांनी मानले.


0 टिप्पण्या