चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-वंदे मातरम हे राष्ट्राचे प्राण तत्व आहे.मातृभूमि चे अप्रतिम असे वर्णन बंकिमचंद्र चटर्जी यांनी केले. वंदे मातरम ने इतिहास घडवला,वंदे मातरम मधून त्यांनी देशाला मातेच्या रुपात मात्र भूमीचे दर्शन घडवले आहे."वंदे_ मातरम" (आई मी तुला वंदन करतो असा याचा अर्थ आहे). या रचनेला आज 150 वर्ष पूर्ण होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत वंदे मातरम ही केवळ एक घोषणा नसून देशभक्तांसाठी एक प्रेरणा ठरली. भारतीय क्रांतिकारावर वंदे मातरम चा प्रभाव पडला,अनेक देशभक्तांनी देशात चेतना,राष्ट्रप्रेम जाग्रत केला,हे गीत स्वातंत्र्य सैनिक व राष्ट्र निर्माणाला अगणित पिढ्यांना प्रेरणा देणारे एक चिरंतन स्त्रोत आहे .हे गीत भारताच्या राष्ट्रीय अस्मिता आणि सामूहिक आत्म्याचे एक चिरस्थायी प्रतीक आहे. त्याग, बलिदान, समर्पण व देश प्रेमाची ज्योत आज ही वंदे मातरम च्या रुपाने तेवत आहे. असे प्रगल्भ प्रतिपादन मा.श्री आशुतोष अडोणी राष्ट्रीय मंत्री,संस्कार भारती नागपूर यांनी व्यक्त केले. संस्कार भारती भंडारा शाखा च्या वतीने श्रीराम हनुमान मंदिर सहकार नगर भंडारा येथे 15 एप्रिल रोजी सायं.6.oo वा.आयोजित वसंत व्याख्यानमालेचे प्रथम दिवशी "वंद्य वंदे मातरम" या विषयांवर प्रथम पुष्प गुंफताना प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.श्री विवेक पत्की हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी संस्कार भारतीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.चंदा प्रकाश मुरकुटे,प्रांत उपाध्यक्ष श्री सुमंत देशपांडे,कार्याध्यक्ष श्री रामदासजी शहारे,उपाध्यक्षा सौ.नीता मलेवार, मंत्री श्री मोहन भाकरे व सौ.अनघा चेपे,संस्कार भारती चे समस्त कार्यकारिणी सदस्य, व गणमान्य व्यक्ति,नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रथम प्रमुख पाहुणे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा व प्रमुख पाहुण्यांचे परिचय श्री सुमंत देशपांडे यांनी करून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.चंदा मुरकुटे यांनी केले. सूत्रसंचालन सौ.सरोज धाबेकर यांनी केले तर आभार श्री केशव जोशी यांनी मानले. कार्यक्रमास योगाभ्यासी मंडळ व भंडारा जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी,सदस्य ही या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडले.


0 टिप्पण्या