युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे;
सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश
सोमनाथ भोसले यांची रिपब्लिकन सेनेच्या फादर बॉडीच्या राज्य सचिवपदी नियुक्ती
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:- जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) ला मोठा धक्का बसला असून युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले व जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशाताई रिकीबे,युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत सरवदे, सोलापूर शहराध्यक्ष शरणु हजारे, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मेहबूब शेख,सोलापूर मीडिया प्रमुख सद्दाम पठाण,बारामती तालुकाध्यक्ष आनंद लोंढे,माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे,तालुका कार्याध्यक्ष संतोष गायकवाड,युवक तालुकाध्यक्ष विकी लोंढे, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,संपर्कप्रमुख राजू बागवान, अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे,शहर उपाध्यक्ष साजिद बागवान, अकलूज शहर महिला आघाडी तालुकाध्यक्ष पुष्पाताई भडंगे तालुका संघटक अभिषेक पवार,तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश ढावरे,तालुका युवक प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील उगाडे, तालुका सहप्रसिद्धीप्रमुख बॉबी उगाडे, तालुका युवक सरचिटणीस सतीश उगाडे,तालुका युवक सहसरचिटणीस प्रकाश उगाडे, तालुका कार्यकारणी सदस्य मारुती भोरे विजय मलमे,अकलूज शहर सरचिटणीस मन्सूर काझी,पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव,पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख सावता नवगिरे,पंढरपूर तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड, इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड, इंदापूर तालुका संपर्कप्रमुख श्रीमंत नरुटे रवी कोळी अरुण कोळी अर्जुन कोळी सचिन चव्हाण मुनाफ कुरेशी आदेश थोरात अर्जुन जाधव सागर कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व समर्थकांनी PRP चे राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याकडे पाठवले.
यानंतर सर्वांनी रिपब्लिकन सेना या पक्षात अधिकृत प्रवेश केला हा प्रवेश सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर,ऍड.अमन आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष डॉ.सुशिल सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी सोमनाथ अरुण भोसले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची रिपब्लिकन सेनेच्या फादर बॉडीच्या राज्य सचिवपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नियुक्तीनंतर बोलताना भोसले म्हणाले, “भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार आजपर्यंत काम केले आहे आणि पुढेही त्याच विचारांनी काम करत राहणार आहे.ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठे कर्तव्य आहे. समाजातील वंचितांच्या न्यायहक्कांसाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन.सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढवणे हेच माझे ध्येय असेल.”माझ्यासोबत आज राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या करण्यात येतील या नियुक्तीनंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जल्लोष,घोषणाबाजी आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.सोमनाथ भोसले यांचा हा नवा प्रवास सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


0 टिप्पण्या