Ticker

6/recent/ticker-posts

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण नोकरी किंवा शिक्षण एवढेच मर्यादित न ठेवता राजकीय क्षेत्रात सुद्धा लागू करा -पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे



खैरलांजी येथे जेतनवन बुद्ध विहार, तथागत गौतम बुद्ध  व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण प्रसंगी मार्गदर्शन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर-जिल्ह्यातील कुही तालुक्यातील खैरलांजी येथे जेतवन बुद्ध विहार, तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण दिनांक 26 एप्रिल 2026 ला भदंत विनयबोधि महाथेरो, भदंत नागसेन, भदंत संघानंद, श्रामनेर बुद्धपाल, शांतीवन बुद्ध विहार चिचाळ चे  संचालक जीवन बोधी बौद्ध, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, विनय ढोके सहसचिव भारतीय बौद्ध महासभा नागपूर, गंगाधर गजभीये धम्म प्रचारक नागपूर  यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.  भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत धम्मदेशना देण्यात आली.  यावेळी मार्गदर्शन करताना पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे म्हणाले की, अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या नावावर भांडण लावण्याचे काम सुरू असून भारतीय संविधानाने कलम 341 नुसार सर्व 59 जातींना एक संघ बांधण्याचे काम केले .परंतु आता त्यात फुट पाडून आरक्षणाचा लाभ एका विशिष्ट जातीलाच म्हणजे फक्त बौद्ध समाजाला मिळाला असा गैरसमज समाजात निर्माण करण्याचे काम सुरू आहे .आरक्षणाचे वर्गीकरण नोकरी किंवा शिक्षण यापुरतेच मर्यादित न ठेवता राजकीय क्षेत्रात सुद्धा ते लागू झाले पाहिजे असे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले. आता लवकरच जात निहाय
 जनगणना होत असून बौद्ध समाजाने अनुसूचित जातीच्या रकान्यात जात महार व बौद्ध धर्म लिहिला तरच बौद्धांची संख्या भारताच्या राज्यपत्रात वाढेल. यावेळी उपस्थित भिक्खु संघ यांना चिवरदान करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व बौद्ध उपासक-उपासिका यांना भोजनदान देण्यात आले . यावेळी चेतवन बुद्ध विहाराला विनय ढोके यांनी पुरातन कालीन  भिक्खूनीचे जीवन, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संदेश पुस्तक भेट देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ् आशिष मेश्राम, प्रमोद वासनिक, शारदा बनसोड करुणा महाजन, विजय बनसोड, प्रदीप बनसोड ,यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या