Ticker

6/recent/ticker-posts

चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांचा माहूर येथे सन्मान....!!!

               
चित्रा न्युज प्रतिनिधी 
श्रीक्षेत्र माहूर:- येथील आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे चित्रकार तथा माहूर भूषण 'रणजीत दत्त वर्मा'  यांचे "ग्वाला" हे एकल चित्र प्रदर्शन जगप्रसिद्ध 'जहांगीर कलादालन मुंबई' येथे दि.16 मार्च 2026 ते दि. 22 मार्च 2026 या दरम्यान पार पडले.त्यानिमीत्याने रणजीत वर्मा यांचा सहृदयी सत्कार समारंभ श्री.आनंद दत्त धाम आश्रम,श्रीक्षेत्र माहूर येथे दि. 02 एप्रील 2026 रोजी सायं. ठिक 06.00 वाजता आयोजित करण्यात आला.हा सन्मान श्री आनंद दत्त धाम आश्रमाकडून मठाधीपती राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद,शाखा माहूर यांच्याकडून संयुक्तरित्या करण्यात आला.
           यावेळी चित्रकार रणजित दत्त वर्मा व त्यांच्या अर्धांगिनी जयश्री सुर्यवंशी यांचा संयुक्त सन्मान करण्यात आला.याप्रसंगी आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीपती राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांनी उपस्थित मान्यवर व भक्तगण यांना रणजीत वर्मा यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे कष्ट व चिकाटी हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे आणि कष्टावीना कुणीच पावत नाही,परिश्रम हिच खरी इश्वरसेवा आहे आणि प्रत्येकानी वर्मा यांचे हे गुण हेरून आपल्या मुलांना केवळ शिक्षण नाही तर विवीध कलांमध्ये निपुण करण्यास आपण प्रयत्नशील असावे असा मोलाचा संदेश दिला.
             तसेच आपल्या मनोगतातून रणजीत दत्त वर्मा यांनी त्यांचा आजवरचा प्रवास सांगत ग्वाला या विषयाला घेऊन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे कसा सफर होता हे विषद केले.त्यांनी आपल्या यशामध्ये आपली पत्नी,भाऊ,भावजय यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले.तसेच वडीलांच्या कडून वारसाने मिळालेल्या या कलेला त्यांनी सातत्य आणि चिकाटीने पुढे कसे नेले हा अनुभव कथन केला.तसेच माहूर व माहूरकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
            कार्यक्रमाचे आयोजक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा माहूर चे तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील यांनी सुरेख सुत्रसंचलन करत आपल्या सहकारी  मित्राने घेतलेल्या कष्टांचे मोल नाही आणि रणजीत दत्त वर्मा म्हणजे माहूरगड ची आज ओळख बनली आहे असे गौरवोद्गार काढत संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
            यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने वसंतराव कपाटे,विजय आमले, नंदकुमार जोशी,इलियास बावानी,संजय घोगरे, अमजद खान हैदर पठाण यांच्यावतीने सह्रदय सत्कार करण्यात आला.जवाहरलाल जयस्वाल,प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर,पुंडलीक हूंबे,गजानन गोडसे,उदय जयस्वाल,कवी मिलिंद कंधारे,प्राध्यापक विनोद कांबळे, प्रवीण वाघमारे,जितेंद्र वर्मा,रांगोळीकार सुरेश आराध्ये व हजारो भक्तगण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या