शेतकर्यांची मागणी : अन्यथा शेती पडीत
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-१ ऑगस्ट २०२६ रोजी साकोली येथील मामा तलाव फुटून प्रचंड नुकसान झाले होते. या घटनेला तब्बल नऊ महीने लोटले तरी शासनाने अजूनही पुर्नबांधणीची मंजूरी दिली नाही. परिणामी या वर्षी पावसाळ्यात सर्व शेतजमीनी पडीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेच्या आत तलावाच्या पाळीची तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर सर्व शेतकरी वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे.
यासंदर्भात शेतकर्यांच्या वतीने तहसिलदार व संबंधित अधिकार्यांना दि. २१ एप्रिल २०२६ रोजी एक निवेदन देवून विनंती करण्यात आली आहे की शासन स्तरावरून माहीती घेवून लवकरात लवकर मंजुरीसाठी प्रयत्न करावे. निवेदनाची प्रतिलिपी जिल्हा जलसंधारण अधिकारी, ल.पा.जि.प. भंडारा यांना पाठविण्यात आली आहे. निवेदन देतांना शेतकरी मनिष कापगते, विष्णु कापगते, नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते, नगरसेवक सपन शरद कापगते, सोनू बैरागी, मोरेश्वर संपत गहाणे,अमित अशोक लांजेवार, सचिन लांजेवार, भीमराव गोपाल गहाणे, मनोहर संग्रामे, प्रकाश संग्रामे, प्रविण लांजेवार आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या