रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- साकोली नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचे स्थानांतर होणार असून त्यांच्या या स्थानांतराची चर्चा साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रात चांगलीच पसरलेली आहे. सध्या मंगेश वासेकर हे काही दिवसांपासून रजेवर असून त्यांचा प्रभार लाखनी येथील एका अधिकाऱ्याकडे दिला गेलेला आहे. त्यामुळे वासेकर येतील तर आपला प्रभार सोपविण्यासाठीच येतील असा तर्क चक्क साकोली नगरपरिषद कार्यातील कर्मचाऱ्यांनीच बांधला आहे. वासेकर यांचा साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषदमध्ये तीन ते चार वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यांच्या कालावधीत साकोली सेंदुरवाफा वार्डातील नवीन प्रभाग रचना आणि नगरपरिषद निवडणूक पार पडली. काही बेधडक कामेसुद्धा साकोली सेंदूरवाफा नागरिकांच्या पसंतीस पडली. विशेषतः नागझिरा रोडवरील अतिक्रमण हटाव मोहीम, मुख्य राष्ट्रीय मार्ग, राष्ट्रीय महामागील गुजरी अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणावर कचरा टाकणाऱ्या दंडित करणे, नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करणे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आपल्या कामाची ताकीद देऊन नागरिकांना सोयीचे कसे होईल यासाठी आग्रह धरणे याप्रकारे अनेक महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या देखरेखित पार पडलीत. त्यामुळे त्यांची कारकीर्द एकदमच ठोस जरी नसली तरी दुर्लक्ष करण्यासारखीसुद्धा नाही. वासेकर यांचे स्थानांतर होऊन नवीन मुख्याधिकारी कोण येणार यांची अटकळ सर्वनाच लागलेली आहे. विशेषता नवीन मुख्याधिकारी कोण येणार याची खरी प्रतीक्षा येथील संपूर्ण व्यावसायिकांना लागलेली आहे.


0 टिप्पण्या