Ticker

6/recent/ticker-posts

भगवान महावीर जन्मकल्याणक प्रभावना महोत्सव, अकलूज येथे मोठ्या उत्साहात सुरू

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:- श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था व सकल जैन समाज, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, अहिल्यानगर, बीड व मुंबई या सात जिल्ह्यांच्या सहभागातून भगवान महावीर जन्मकल्याणक प्रभावना महोत्सव, अकलूज येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे.

मंगल सानिध्य :
प.पू. उच्चारणाचार्य श्री १०८ विनम्रसागरजी महाराज ससंघ (११ पिंछी)
प.पु. जगतगुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, नांदणी
प.पु. जगतगुरू स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, कोल्हापूर

भव्य महावीर जयंती कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील, आमदार मा. श्री.रणजितसिंह मोहिते पाटील, मा. सौ. शितलदेवी मोहिते पाटील, मा. सौ.रेश्माताई अडगळे (नगराध्यक्ष), मा. श्री.शिवतेजसिंह मोहिते पाटील (उपनगराध्यक्ष) तसेच कु. इशिता मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसंगी अकलूज नगरपरिषदेचे सर्व नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने प्राथमाचार्य शांतिसागर महाराज यांचे नाव महावीर पथ (उदयसिंह मोहिते पाटील शॉपिंग कॉम्पलेक्स ते अकलाई I.C.U. नवीन बस स्थानक पाठीमागील रस्ता) या मार्गाला देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेत आज आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सदर रस्त्यास नाव देण्याबाबत नगराध्यक्षा मा. सौ. रेश्माताई अडगळे व उपनगराध्यक्ष मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना आवश्यक त्या सूचना दिल्या व सदर मार्गाला नाव देण्याचे आश्वासन दिले.

या वेळी जैन समाजातील साधू-संत व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या