Ticker

6/recent/ticker-posts

गोवा राज्यातील राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा पुरस्कार सोहळा संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : पणजी (गोवा), एप्रिल 2026 : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रुपेश पांडुरंग कुतरमारे  राहणार  बोपापुर ( ता) पोस्ट चिकणी ता वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा गोवा येथील कला अकादमी, पणजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा बहुमान मिळाला.

हा प्रतिष्ठित पुरस्कार डॉ. सुरेश राठोड फाउंडेशन आणि शांतिदूत परिवार सर्किट बेंच फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. देशभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी युवा व क्रीडा व्यवहार मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्राचे माजी संचालक प्रमुख अतिथी म्हणून कालीदास घाटवाल  उपस्थित होते. तसेच गोवा विधानसभेचे उपसचिव मोहन गावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय डॉ. सुरेश राठोड फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच इतर मान्यवर ही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

रुपेश कुतरमारे यांनी (NSS) राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. समाजजागृती, विद्यार्थ्यांना मदत, ग्रामीण विकास आणि स्वयंसेवा या क्षेत्रांमध्ये त्यांनी सातत्याने कार्य केले असून त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.

आपल्या यशाबद्दल बोलताना रुपेश कुतरमारे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाची बाब असून यामागे माझ्या शिक्षकांचे आणि आई वडील  यांचे मोठे योगदान आहे.”

त्यांनी विशेष आभार व्यक्त करताना  रा. से. यो कार्यक्रम अधिकारी  सुरेश राठोड, रा. से. यो कार्यक्रम अधिकारी डॉ. धनश्री पंचभाई, प्रा  मोक्षदा,  कनिष्ठ महाविद्यालया 
तिल 12+ रा से. यो चे कार्यक्रम अधिकारी निरज आत्राम, मारोती मुंडे तसेच वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. नरेंद्र पाटील आणि सर्व वाणिज्य विभागातील शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. “तुमच्या सहकार्यामुळेच मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो,” असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रुपेश यांच्या कार्याचे कौतुक करताना  त्यांना शाल,श्रीफळ,  सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारचे पुरस्कार युवकांना समाजासाठी कार्य करण्यास प्रेरणा देतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

समारोप प्रसंगी समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या