Ticker

6/recent/ticker-posts

चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसा निमीत्य रक्तदान शिबिर संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून, चंदनसिंह चंदेल (माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात व समाजभावनेने पार पडले.

या उपक्रमासाठी विशेष मार्गदर्शन व नेतृत्व देवेंद्र वाटकर – चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ
गणेश वनकर – अध्यक्ष, जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य व चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ समाजातील अनेक बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून मानवतेचा अनमोल संदेश दिला.
 आपल्या  एका रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, या विचाराने सर्वांनी सहभाग नोंदवला दिनांक: 07 एप्रिल 2026, मंगळवारला एकता लॉन, डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, बल्लारपूर
जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूर व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.

रक्तदान करणारे शंकर भाऊ चौधरी – अध्यक्ष, बल्लारपूर तालुका, महाराष्ट्र नाभिक महामंडळ गणेश भाऊ चेंने – अध्यक्ष, राजुरा तालुका, जय जिवाजी क्रांती सेना मिथुन हनुमंते – सचिव, बल्लारपूर तालुका, महाराष्ट्र नाभिक महामंडळ सुरज वाजा, अंकित मोहुर्ले वैभव अटकरे
 आयोजक रक्तदान जीवनदायिनी समिती, बल्लारपूर या सामाजिक उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व सहकार्य करणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार! मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या