*वरोरा न्यायालयाचा धडक निर्णय : रेल्वे अभियंता सिद्धार्थ गुप्ता यांच्यावर FIR चे आदेश
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : वरोरा येथील न्यायालयाने ८ एप्रिल २०२६ रोजी धडक निर्णय देत रेल्वेचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ गुप्ता यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे महसूल व प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात
न्यायालयाने सादर दस्तऐवज व ठोस युक्तिवाद ग्राह्य धरत भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६१(२), ३१६(५), ३१८(४), ३३६(३), ३४०(१)(२) नुसार गुन्हा नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे.
सरकारी जमिनीवर कोट्यवधींचा घोटाळा? उघड
मौजा डाहाळ रिट (ता. वरोरा) येथील सरकारी जागेवर रेल्वेची मालकी नसतानाही शेकडो ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यावरुन अधिकाऱ्यांची निष्क्रियता उघडपणे दिसत आहे.
महसूल विभागाने काही वाहने जप्त करून दंडाची कारवाई केली, मात्र मुख्य आरोपीविरुद्ध FIR दाखल करण्याचे धाडस कोणत्याही अधिकाऱ्याने केल्याचे दिसत नाही.
एवढेच नव्हे, तर दंडाची रक्कमही अद्याप वसूल करण्यात आलेली नाही.
न्यायालयाचा कडक हस्तक्षेप
अखेर न्यायालयाने हस्तक्षेप करत FIR दाखल करण्याचे आदेश दिले असून, वरोरा पोलीस ठाण्यात संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला जाणार सल्याची माहिती.अपीलार्थी विनोद खोब्रागडे (सामाजिक कार्यकर्ते, RTI जिल्हाध्यक्ष – चंद्रपूर) यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या