Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतिकारी संत कबीर वाचनालय द्वितीय वर्धापन समारो ह सोहळा उत्साहात साजरा. प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांचा गायनातून रसिक मंत्रमुग्ध, जाहीर सत्कार.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : कामठी शहरातील क्रांतिकारी संत कबीर वाचनालय, द्वितीय वर्धापन समारोह सोहळा सोमवार दिनांक - 6 एप्रिल 2026 ला सकाळी 11:30 वाजता क्रांतिकारी संत कबीर वाचनालय, जयस्तंभ चौक कामठी जिल्हा नागपूर. येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष - प्रदीप शा. फुलझे ले ( समिती अध्यक्ष ) होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून - कवी साहित्यिक नागनाथ डोलारे पनवेल मुंबई यांचा हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक- डॉक्टर गौरीशंकर एम. मेश्राम, प्रमुख पाहुणे म्हणून - कवी साहित्यिक गझल का र मधु बावलकर, भंते  नाग दीपंकर महाथेरो, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार  प्रदीप कडबे, एडवोकेट  सुधाकर लिही पांडे, एडवोकेट बी एम.सोमवार, गायिका नीलकमल गोंडाने, सामाजिक कार्यकर्त्या रमा गजभिये, चक्रधर रामटेके, विजय डोंगरे, रामटेके, राजू मेश्राम, उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांचा प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील  भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनातून " ऐसी जगह बैठीये, कोई ना बोले उठ! ऐसी बात कही ये, कोई ना कहे झूठ! संत कबीर. क्रांतिकारी भीम गीत - कष्ट केलेत माझ्या भिमाने, जाती जातीत वाटू नका रे, संविधान दिले भारताला, ज्यानं त्याची तुम्हा राहू द्या रे, कष्ट केले त माझ्या भिमाने. भीम गीत सादर केले, त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक समिती अध्यक्ष - बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते प्रदीप फुलझे ले, सूत्रसंचालन अतुल येरगुडे यांनी केले तर  नरेंद्र वाघमारे यांनी आभार मानले,  वाचक सभासद, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या