Ticker

6/recent/ticker-posts

भेंडाळा परिसरातील जमीन अधिग्रहण आदेशाची शेतकऱ्यांकडून जाहीर होळी

⭕ जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया न थांबवल्यास  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित JSW प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक व उत्पादनक्षम जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या अन्यायकारक जमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील शेतकरी व नागरिक आक्रमक झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, शासनाने 11 फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णयाचा (जीआर) निषेध म्हणून भेंडाळा येथे शेतकऱ्यांनी सामुदायिक होळी दहन करून संताप व्यक्त केला. 
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनावर गंभीर आरोप केले.
ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी भडकावून, कवडीमोल दराने बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे काम शासन जाणीवपूर्वक करू पाहत आहे. हा विकास नसून शेतकऱ्यांच्या संसाराचा आणि भविष्याचा संपूर्ण नाश आहे. 
शेतकऱ्यांची संमती न घेता, स्थानिक ग्रामसभांचा विश्वासात न घेता आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता जमीन अधिग्रहण करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. “जर शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला असून येत्या 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येते हजारो शेतकऱ्यांसह धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे सह माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई भगत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, दिगंबर धानोरकर, विजय लाड,  नारायण बांगरे, सदानंद जवादे, पांडुरंग भरे, संजय खेडेकर, भुवनेश्वर चौधरी, धनराज पोरटे, मनोहर तुंबडे, उमाजी ठाकूर, काशिनाथ चौधरी, रोहिदास धोबे, गुरुदास चौधरी, कैलास सातपुते, विकास रायसीडाम, नीलकंठ कुथे, मारुती उमलवार, नरेंद्र जुवारे, सौ. कुंदाताई जुवारे, सुनील कन्नाके, नवनाथ चौधरी, संजय चलाख, दामोदर आभारे, मधुकर ढोबे. यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजरोच्या संख्येने शेतकरी बांधव-भगिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या