जिवनाच्या वाटेवरील दिपस्तभ प्रेरणादायी रामनारायणसिह खनवे
वयाचं वयाचं वाढणं निसर्गाची किमया आहे ,पण त्यासोबत विचारांनी परिपक्व होणं आणि सन्मान वृद्धींगत होण हे आपले कर्तृत्व आहे. ज्याच्या आयुष्यात निसर्गाची किमया आणि स्वतःची कर्तुत्व हातात हात घालून वृदिंगत होतात ती माणसे सर्वार्थाने मोठे होतात असेच आमचे कर्तृत्ववान सुसंस्कृत विनयशील आणि मनमिळावु स्वभावाचे आदरणीय श्री रामनारायण सिंहजी खनवे! अशा या रामनारायणसिंहजी चा जन्म रामनवमीच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील परसापूर येथे छोट्याशा खेड्यात पण सदन परिवारात एक जुलै १९४७ ला झाला. खनवेजिच्या बाबतीत सांगायचे झाले तर He was born with silver spoon in his mouth चौथा वर्ग शिकलेले वडील गंगारामजी खनवे पण उच्च कोटी चे व्यवहारज्ञानी, सामाजिक ज्ञान व सुस्वभावी होते तसेच परसापूर शाळा समितीचे ते अध्यक्ष पण होते.शेती व्यवसायासोबतच फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिनेमा टॉकीज भाड्याने घेऊन चालवीत असत. आई भागीरथीबाई निरक्षर होत्या.दिसायला सुंदर देखण्या असून ईश्वरराव त्यांची श्रद्धा होती. शिक्षणाची जाण असलेल्या त्याचे वडिलांना श्री रामनारायण कानबाई यांना बी ए आणि शारीरिक शिक्षणाचा डिप्लोमा पर्यंत शिकवले. त्यांनी सर्वच परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या. १९६६-६७ पासून राष्ट्रीय हायस्कूल अचलपूर शासकीय हायस्कूल धारणी येथे शिक्षकाची नोकरी १९७१पर्यंत केली. १९७१ ला वडिलांचे दुःखद निधन झाल्याने परिवाराची संपूर्ण घडी विस्कटली. कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी श्री खनवे यांचेवर आल्याने त्यांनी नौकरीचा स्व इच्छेने राजीनामा दिला*.
१९७० साली वयाच्या 23 व्या वर्षी नागपूर येथील निवासी प्रतिष्ठित नागरिक माणिकसिंह बाहुली यांची लाडकी सुपुत्री कु. सजलाबाई यांच्याशी विवाह झाला. त्या अतिशय सालास सुसंस्कृत आणि त्या काळातील दहावीपर्यंत शिकलेल्या होत्या. त्यांनी कुटुंबाला सुसंस्कृत उच्चशिक्षित केले त्यामुळे त्यांना आदर्श माता म्हणून यवतमाळ येथील सामाजिक संस्थेने सन्मानित केलं. त्यांना दोन मुले व चार कन्यारत्न प्राप्त झाले. सहाही अपत्ये उच्च कायद्याचे पदवीधर असून सर्वांनी LLM पर्यंतची उच्चतम पदवी प्राप्त केली आहे. सर्वात ज्येष्ठ कन्या ह्या अहिल्यानगर येथे न्यायाधीश आहेत. आणि ज्येष्ठ सुपुत्र शासकीय समाजकल्याण विभागात इन्स्पेक्टर पदावर नोकरी करीत आहेत .बाकीची सर्व अपत्य निरनिराळ्या न्यायालयामध्ये वकील याचा व्यवसाय यशस्वीपणे करीत आहेत. त्यांचे मोठे बंधू स्व. लक्ष्मीनारायणसिंह हे तीस वर्षे परसापूर या गावचे पोलीस पाटील होते आणि त्यांचा लहान मुलगा ॲड. महेंद्रसिंह खनवे यांनी सुद्धा पाच वर्ष पोलीस पाटील म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. उभयतांनी संपूर्ण परिवाराला उच्चशिक्षित केल्यामुळे परिसरात उच्चशिक्षित परिवार म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे.
कौटुंबिक जीवनाचा सांभाळ करीत असतानाच श्री खनवे याचा कल ज्येष्ठ नागरिकांचे सेवा करण्याकडे गेला. २००९ मध्ये परसापूर येथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला कारण त्यांची कल्पना होती की ज्येष्ठत्व हा केवळ वयाचा टप्पा नाही तो अनुभव,त्याग आणि संस्काराचा दीपस्तंभ आहे. अनुभव, ज्ञान,चातुर्य ,हुशारी व कौशल्याचा ज्ञानाचा मोठा झराच आहे .या संकल्पनेतून त्यांनी ग्रामीण भागात पहिला ज्येष्ठ नागरिक संघ २००९ ला स्थापन केला. त्या संघाचे सचिव व अध्यक्ष म्हणून सतत बारा वर्षे पदाधिकारी राहिले. आजही ज्येष्ठ सल्लागार म्हणून संघात कार्यरत आहेत .ज्येष्ठांकरिता आधारवड असलेला फेस्कॉम संघटनेत २०१२ पासून सदस्य पदी विराजमान होते. आज संपर्क सचिव म्हणून चौथ्या टर्म मध्ये कार्यरत आहेत. परसापूर गावच्या विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून चार वेळा बिनविरोध त्यांची निवड झाली. याशिवाय यावर्षी २०२६ मध्ये अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे भुवनेश्वर येथील३५ व्या अधिवेशनामध्ये त्यांनी स्थापन केलेल्या गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघ परिसापूर या संघाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने पुरस्कृत करण्यात आले. हा त्यांचा कर्तुत्वाचा बहुमान आहे. नुकतेच अखिल भारतीय क्षेत्रीय महासंघाचे अधिवेशन दि. ५ एप्रिल २०२६ ला अमरावती येथे झाले. त्यात त्यांची अमरावती जिल्ह्याचा ग्रामीण क्षत्रिय संघ महासंघाचे कार्यकारणी वर निवड झाली. आज त्यांची वयाची ७८ वर्षे पूर्ण होऊनही शतकाच्या पुढे जाण्याचा दृष्टिकोन व झेप तसेच त्यांचा उत्साह दांडगा आहे .त्यांचे जीवनात अशक्य व रिटायर हे दोन शब्द पूर्णपणे त्यांचे इच्छाशक्ती पुढे हद्दपार झाले आहेत.
*झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा* या खंबीरतत्त्वानुसार अगदी तरुणाला लाजवेल असे त्यांचे जीवनकार्य नित्यनियमाने सुरू आहे. आजही त्यांचा हौसला बुलंद आहे. सकारात्मक ऊर्जेने त्यांचे ओतप्रोत जीवन भरले असून त्यांच्या जीवनाची वाटचाल यशस्वीपणे सुरू रहावी व त्यांची मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी परमेश्वर चरणी आमची प्रार्थना आहे.
कुछ किये जावो, लेक के नाम खुदा खुदा कृष्णा करना बडी खराबी है! कामयाबी कुछ और नही सतत काम करनाही कामयाबी है!!
असे आमचे रामानारायणसिंहजी खनवे यांचे अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती व महाराष्ट्राचे ज्येष्ठ नागरिक महासंघकडुन अभिनंदन त्यांना दीर्घ उदंड व ऊर्जामय आयुष्य लाभो अशा खूप खुप शुभेच्छा!
श्री. पुरुषोत्तम गावंडे अध्यक्ष, पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग अमरावती
श्री दामोदर पवार अध्यक्ष अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती प्राचार्य दिलीप सिंह खांबरे ( शिसोदिया)
मार्गदर्शक तथा कार्यकारिणी सदस्य


0 टिप्पण्या