चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्थानिक बहिरंगेश्वर मंदिर परिसरामध्ये संस्कार भारती भूअलंंकरण विधा भंडारा द्वारा आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त भूमीला अलंकृत करण्यात आले. यातील सहभागी कलावंत होते सविता गंगणे, अनिता चौधरी, नंदा तिडके ,शालिनी बाळबुधे ,रूपाली निर्वाण, सीमा देव्हारे, माया बोरकर.
अतिशय उत्साहात आणि आनंदात हा वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारणीतील मार्गदर्शक सुमंत देशपांडे ,दत्ताभाऊ दाढी, केशव जोशी ,मोहन भाकरे, चंदा मुरकुटे, नीता मलेवार ,आणि अनघा चेपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


0 टिप्पण्या