चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- जिल्ह्यातील अडयाळ येथे पवनी तालुक्यातील पत्रकारांची महत्त्व पूर्ण बैठक अड्याळ येथील मानापुरे सेलिब्रेशन हॉल येथें उत्साहात पार पडली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर होते. तर प्रमुख उपस्थितीत पत्रकार हसंराज रामटेके, अनमोल मेश्राम,राकेश श्यामकुवर ,उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर म्हणाले, " पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारी व त्यांच्या कुटुंबीयांना नियमाप्रमाणे लाभ मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणजे व्हाईस ऑफ मीडिया होय.". त्यामुळे आज आपले भारत देशात चार लाख 70 हजार पत्रकार सदस्य गण असलेली जागतिक पातळीवरील संघटना ठरलेली आहे. त्यामुळे या संघटनेत सर्व मीडिया पत्रकारांनी निशंकोचपणे सामील होऊन आपल्यावर होणारे अन्याय आणि पाल्यांना उच्चस्तरीय शिक्षण तसेच हक्काचे घर मिळवून घेण्यासाठी संघटना आतापर्यंत नेहमी झटत आलेली आहे. आणि म्हणून या संघटनेविषयी पत्रकार बांधवांमध्ये आपुलकी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आणि सोशल मीडियाचे पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात सदस्यता स्वीकारलेली आहे.
या सभेला पवनी तथा तालुक्यातील जेष्ठ पत्रकार, धनंजय जटाल, लोकमत समाचार,हितवाद,भागवत आकरे, पुण्यनगरी,चरणदास बावने कोंढा, लोकमत,ब्रह्मदास बागड़े, देशोन्नति, शाहीद अली पवनी ,लोकमत,सकाळ, विशाल रणदिवे लोकमत अड्याळ, पंकज वानखेडे नवराष्ट्र, विक्की पचारे देशोन्नती, राजेश येलशेट्टीवार नवराष्ट्र , शरद देव्हाडे लोकमत , देवचन्द्र सावरबांधे ,अमित रणदिवे , विदर्भ लोकवाणी, अवेकिंग न्यूज इत्यादी पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होती.
या सभेचे सूत्रसंचालन , शाहीद अली यांनी केले, तर उपस्थितांचे आभार , चरणदास बावने यांनी मानले.
या बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या, सुविधा आणि हक्कांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने पत्रकारांसाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांवर ठोस भूमिका मांडण्यात आली. यामध्ये पत्रकारांना बसपास सुविधा मिळावी, पात्र व योग्य व्यक्तींना पत्रकारितेत संधी मिळावी, अपघातग्रस्त पत्रकारांना तातडीने ५० हजारांची आर्थिक मदत द्यावी, पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या पाल्यांना महाराष्ट्र राज्य सेवा आयोग परीक्षेचे मोफत ऑनलाईन व ऑफ लाईन वर्ग उपलब्ध करणे तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि अत्याधुनिक पत्रकार भवन उभारण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
याशिवाय, पत्रकारांना त्यांच्या कार्यादरम्यान येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणे अत्यावश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
बैठकीत पत्रकार संघटनेची एकजूट मजबूत करण्यावर आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


0 टिप्पण्या