चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथील वैद्यकीय अधीक्षक मा डॉ तलमले सर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ शरद जोगी, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ जुनेद यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला रुग्णालयातील ओपीडी मध्ये जागतिक हिवताप दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येऊन त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ महाजन, डॉ शेकार, श्री लेंडे, श्री साळुंखे यांनी हिवतापा बाबत रुग्णांना तसेच नातेवाईकांना विस्तृत माहिती.
यावर्षीचे हिवताप दिनाचे घोषवाक्य "हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध आता हे शक्य आहे आता केलेच पाहिजे" याविषयी जनजागृती पर माहिती देण्यात आली यावेळी डॉ महाजन, डॉ शेकार, श्री लेंडे, श्री भोयर, श्री मेश्राम, श्री शालामोहन, श्री अग्रवाल, श्रीमती ठाकूर, लोखंडे, मेंढे, बर्डे सिस्टर व सर्व कर्मचारी रुंद हजर होते हा कार्यक्रम श्री साळुंखे (Mpw) यांनी उत्कृष्ट नियोजन करून यशस्वी केला व हिवताप दिन साजरा करण्यात आला.


0 टिप्पण्या