जिल्हा आपूर्ति अधिकारी सोबत बैठक
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-भंडारा शहरात भंडारा गॅस एजेंसी मार्फत घरगुती सिलेंडर चा पुरवठा करण्यात येते पण मागील 2 महिन्यापासून घरगुती गॅस सिलेंडर चा पुरवठा नियमितपणे करण्यात येत नसल्याने अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या.
अ .भा.ग्रा.पं.च्या प्रांत पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता बर्याच अनियमितता असल्याचे निदर्शनास आले_जसे ग्राहकांना सिलेंडर गोदामातून घेऊन जाण्यास सांगण्यात येते, सिलेंडरचे वाटप गोदामातून ग्राहकाला देण्यात येते,जे कायदेशीररीत्या योग्य नाही. सिलेंडर नेत असताना काही अनुचित घटना झाली तर त्याची जबाबदारी कोणावर राहील व इतर ही अनेक अनियमितता आढळून आल्या.
वरील सर्व परिस्थितीचा विचार करता काही उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली.
1)भंडारा शहरातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर चा पुरवठा एजेंसी मार्फत घरपोच करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना सिलेंडर गोदामातून घेवून जाण्यास सांगु नये.
2)एजेंसी च्या दर्शनी भागात कोणत्या_ कोणत्या भागात कोणत्या तारखेचे वाटप सुरू आहे याचा बोर्ड लावाव, ग्राहकांनी नंबर लावून व ओटीपी येवून 1 महिना उलटून ही सिलेंडर चा पुरवठा झाला नसल्याचे समजत आहे तरी कंपनीशी चर्चा करून प्रलंबित यादीतील ग्राहकांना सिलेंडरचा पुरवठा लवकरात _लवकर होईल यास्तव कार्यवाही करून अवगत करावे अशी पत्रात सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री रतनलाल ठाकरे, आपूर्ति अधिकारी सुहास टोंग,दीपिकाअन्नपूर्णे,अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प. क्षेत्रीय संघटन मंत्री सर्वश्री नितीन काकडे, जिल्हा अध्यक्ष जयंत सब्ज़ीवाले , जिल्हा सचिव अनिल शेंडे,विदर्भ आईटी सेल प्रमुख चंद्रशेखर साठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कुरोड़े , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद सईद शेख ,दत्तात्रेय दाढी इत्यादी पदाधिकारी सह भंडारा(गुर्जर)गॅस सर्विस च्या मालक श्रीमती पूर्वा गुर्जर, मैनेजर किशोर गजभिये उपस्थित होते.


0 टिप्पण्या