Ticker

6/recent/ticker-posts

प्रवासी सोयीसाठी एक पाऊल पुढे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली - आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन साकोलीतील प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर निवेदन दिले. साकोली हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. परंतु अनेक बसेस थांबत नसल्याने नागरिकांचे हाल होतात.
 सदर निवेदनात  वर्धा, नागपूर, अकोला आणि लाखणी या दिशेने येणाऱ्या सर्व बसेसना 'लाखंदूर रोड' या ठिकाणी अधिकृत थांबा देण्यात यावा. वडसा, आरमोरी आणि चिमूरकडे जाणाऱ्या बसेसना देखील प्रवाशांच्या सोयीसाठी थांबा निश्चित करण्यात यावा. यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा होईल. साकोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी नगरसेवक म्हणून सदैव कटिबद्ध राहीन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या