Ticker

6/recent/ticker-posts

रेती तस्करी करणारा १ ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडला

स्थानीक गुन्हे शाखा भंडारा पोलीसांची मूरमाडी(तूप.) येथे कारवाई

७ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

ट्रॅक्टर चालक/मालकावर गुन्हा दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-लाखणी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकीवर कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस पट्रोलिंग करीत असताना एक विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा स्वराज ७३५ कंपनीचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाच्या ट्रॉलीने चुलबंद नदीच्या पात्रातून विना परवाना विना पास रेतीची अवैद्य वाहतूक करतांना सोमवारी (ता.६एप्रिल) रोजी स९:१५ वाजता दरम्यान मिळून आल्याने ट्रॅक्टर चालकावर पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत ७ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेंद्र धनिराम मेश्राम (३२वर्ष) रा.चीचटोला ता.लाखनी असे आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित केले आहेत.त्यानुसार जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत स्थानीक गुन्हे शाखा भंडारा येथिल पोलिसांची पेट्रोलिंग अहोरात्र सुरू आहे.मंगळवारी सकाळच्या सुमारास पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुरमाडी (तूप.) येथील सहकारी बँकेजवळ पोलीस कर्मचारीं पेट्रोलिंग दरम्यान सोमवारी ६ एप्रिल रोजी स.९.१५ वाजता दरम्यान ट्रॅक्टर चालक/मालक हा विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व सोबत जोडलेली विना क्रमांकाची ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष  घटनास्थळावरून जप्त करून अवैध व विना परवाना विना पास रेती वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवितांना मिळून आल्याने स्था. गु. शा. भंडाराचे पो.हवा.सुनील शामराव ठवकर यांच्या फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक/मालक विरुद्ध अपराध क्रमांक ८८/२०२६ कलम ३०५(ई),भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे पालांदूरचे प्रभारी ठाणेदार राजेश साळवे यांचे मार्गदर्शनात पो.हवा.धनराज भालेराव करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या