Ticker

6/recent/ticker-posts

नागझिरा रोडच्या सिमेंटीकरण करणासाठी नगरसेवकाचे जिल्हा परिषदेला निवेदन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली: नॅशनल हायवे क्रमांक ५३ ते करंजेकर कॉलेज (नागझिरा रोड) या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व सौंदर्यकरण करण्यात यावे यासाठी गटनेता तथा नगरसेवक इंजि. संदीप बावनकुळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषद भंडारा येथील कार्यकारी अभियंता विनोदकुमार चुऱ्हे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. नागझिरा रोड या परिसरातील रहिवासी, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना ५०५४ अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन कामाला मंजुरी देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली. निवेदनाची दखल घेत कार्यकारी अभियंता चुऱ्हे यांनी उपकार्यकारी अभियंता इंजि. सचिन राठोड यांना या कामाबाबत तातडीने तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे व आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

                वाहतुकीचा प्रश्न सुटणार

गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गाच्या सौंदर्यकरण व सिमेंटीकरणची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती. रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता निर्माण होत होती. आता सिमेंट काँक्रिटीकरण आणि सौंदर्यकरणकरण झाल्यास हा मार्ग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. यावेळी नगरसेवक संदीप बावनकुळे यांनी सांगितले की शहराच्या अंतर्गत रस्त्यांचा विकास करणे हे आमचे प्राधान्य असून करंजेकर कॉलेज मार्ग हा विद्यार्थ्यांच्या दळणवळणासाठी तसचे जमनापूर येथील रहिवासी व नागझिरा पर्यटकांसाठी महत्त्वाचा असल्याने या कामासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या