Ticker

6/recent/ticker-posts

सेवावसती टाकळी (भंडारा ) येथे आरोग्य शिबिर संपन्न -

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-समाज जागृती प्रतिष्ठान व सेवांकूर संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संजय मानकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवावस्ती टाकळी येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले . शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी करून रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले . रुग्णांना मोफत औषधी वितरीत करण्यात आली . डॉ. मानकर सरांनी उन्हाळ्यातील आजार , उष्माघात , उन्हाळ्यातील आहार -विहार . 19 एप्रिल जागतिक यकृत (लिव्हर )दिवस , यकृताचे महत्व , यकृताचे विविध आजार , लहसूनचे महत्व , पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण ,22 मार्च जागतिक जल दिवस , लसीकरणाचे महत्व , हिवताप (मलेरिया ) प्रतिबंध , प्राणिजन्य आजार , आयुष्यमान भारत योजना इ. विषयी मार्गदर्शन करण्यात आले .
सेवांकुर संस्था नागपूरचे सदस्य . प्रशिक्षणार्थी विद्यार्थी , विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला डॉ. संजय मानकर सरांनी विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा व्यवसायातील
विविध अनुभव शेअर केले .
शिबिराची व्यवस्था श्री. स्वप्नील येवले व सागर उजवणे यांनी चोखपणे सांभाळली . सेवावसती समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले .
शशिकांत हजारे यांनी परशुराम जयंती व अक्षय तृतीया उत्सवा निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या . .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या