Ticker

6/recent/ticker-posts

आठवडी बाजार अंगावर बेतला टू व्हीलर गाडीने मागवून मारली ठोकर चित्रलेखा दिलीप आकरे जागीच गंभीर, लक्स हॉस्पिटल भंडारा येथे मृत पावली


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -तालुक्यातील पहेला येथील रहिवासी सौ. चित्रलेखा दिलीप आकरे आठवडी बाजार आणण्याकरता दिनांक 17 एप्रिल 2026 ला सायंकाळी 7 वाजता गेली असता  रजत दलिराम चवळे वय 30 याने भरधाव वेगाने टू व्हीलर गाडी चालवून मागवून  ठोकर मारल्याने चित्रलेखा दिलीप आकरे वय 50 जागीच गंभीर झाली .त्यामुळे तिला लगेच भंडारा येथील लक्स हॉस्पिटल भंडारा येथे भरती करण्यात आले होते .दोन दिवसांच्या उपचारानंतर दिनांक 19 एप्रिल 2026 ला दुपारी 1 वाजता तिची प्राणज्योत मावळली त्यामुळे आकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा विशाल, 4  मुली व पती बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या स्वभाव मनमिळाव असून त्यांच्या जाण्याने परिसरातील जनता शोकाकुल आहे. त्यांच्या पोस्टमार्टम करण्यात आला असून उद्या सकाळी 8 वाजता प्रेतयात्रा त्यांच्या घरून निघणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या