Ticker

6/recent/ticker-posts

महानायिका विचारवाण परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या महानायिका विचारवाण परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा इंदराज सभागृह, सार्वजनिक वाचनालय, गांधी चौक भंडारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
        क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता. संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानाचे प्रमुख प्रा. बाळासाहेब गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात ओबीसी संघटक जिल्हा गडचिरोली व कनिष्ठ महाविद्यालय वडसाचे प्राचार्य दामोधर सिंगाडे व प्रा. डॉ. जयश्री सातोकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे यांनी केले.
             याप्रसंगी महानायिका विचारवाण परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या परीक्षार्थ्यांचा सत्कार करून पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये सै. किरण रत्नपाल डोहणे यांनी ८५ गुणांसह प्रथम क्रमांक, सौ. लता संजीव बोरकर यांनी ८३ गुणांसह द्वितीय क्रमांक तर डॉ. रक्षिता महेश शेंडे यांनी ८१ गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. मान्यवरांच्या हस्ते यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रोत्साहनपर पारितोषिकांमध्ये सौ. हर्षा उद्धवजी भुरे, डॉ. मृणालिनी देवेंद्र फुले, विद्या विलास ठवकर, मंजुषा सहादेव लोंदासे, प्रियंका भाऊराव कागदे, शितलादेवी पुरुषोत्तम धकाते आणि भावना लक्ष्मीनारायण नेमा यांचा समावेश होता. यावेळी संविधान जागर, सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व तसेच महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब गावंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रीती भेलकर यांनी तर उपस्थितांचे आभार श्री. रेहपाळे यांनी मानले. पारितोषिकाचे प्रायोजक श्री. सपाटे, श्री. बेंदेवार, श्री. अमित कुमार फुंडे, डॉ. क्रिष्णा मेश्राम, डॉ जयश्री सातोकर होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक श्री. सुरेश भवसागर, हेमा गजभिये, मंगला डहाके, अर्चना गुरवे, सुरेखा गायधने, श्री. लोंदासे व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या