शेतकऱ्यांनी केला 58 लाखांचा खर्च, अन्नद्रव्ये वाढून उत्पादनवाढीची आशा
चित्रा न्युज प्रतिनिधी
वरोरा: वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेसा गावात अंबुजा फाउंडेशनच्या 'शाश्वत कृषी जल उपक्रम' अंतर्गत राबवलेल्या गाळ उपसा उपक्रमाने शेतकऱ्यांना नवी दिशा दिली आहे. गाव तलावातील गाळ काढून तो थेट शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचा अत्यंत उपयुक्त व स्तुत्य उपक्रम येथे राबवण्यात आला.
या उपक्रमात अंबुजा फाउंडेशनने तलावातील गाळ काढून देण्याचे काम केले, तर गावातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ शेतापर्यंत वाहून नेऊन शेतात पसरवण्याचे काम केले. श्रमदान आणि सहकार्यातून शाश्वत शेतीचे उत्तम उदाहरण येथे पाहायला मिळाले.
आकडेवारीत उपक्रम:
(1) *सहभागी शेतकरी:* 70 (2) *एकूण गाळ उपसा:* 65,293.67 घनमीटर (3) *शेतकऱ्यांनी केलेला खर्च:* गाळ वाहतूक व शेतात पसरण्यासाठी मजुरीसह अंदाजे ₹58,69,230/-
तलावातील गाळ हा नैसर्गिक खतासारखा असतो. या उपक्रमामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढणार असून जमिनीतील अन्नद्रव्ये व उपयुक्त जीवजंतूंची वाढ होऊन शेती उत्पादन वाढीस मोठी चालना मिळणार आहे. पाण्याची धारणक्षमताही वाढेल.
या लोकहितकारी व कृषी विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत मेसा व गावकऱ्यांनी अंबुजा फाउंडेशनच्या कृषी शाश्वत जल उपक्रमाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
सरपंच ग्रा.पं. मेसा म्हणाले, "अंबुजा फाउंडेशनने आमच्या गावाला खऱ्या अर्थाने 'सुपीक' केले. शेतकऱ्यांनीही स्वतःच्या खिशातून खर्च करून सहभाग घेतला, हे कौतुकास्पद आहे.
-------------------------------------------------
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज!
वरोरा तालुक्यातील मेसा गावात अंबुजा फाउंडेशनच्या पुढाकाराने 'गाळमुक्त तलाव, सुपीक शेती' अभियान. 70 शेतकऱ्यांनी 65 हजार घनमीटर तलावातील गाळ स्वखर्चाने शेतात नेला. ₹58 लाख खर्च करून शेतकऱ्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली. उत्पादनवाढीची आशा. ग्रामपंचायतीकडून अंबुजा फाउंडेशनचे आभार!


0 टिप्पण्या