चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:- लातूर भारत स्काऊट व गाईड कार्यालय,लातूर येथील वरिष्ठ लिपिक सचिन सुधाकर सुरवसे, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हंडरगुळी ता. उदगीर येथील स्काऊट मास्टर सुगावे बालाजी चंद्रकांत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिवणी (बु.) ता. औसा येथील स्काऊट मास्टर प्रमोद नरसिंग कटके यांनी भारत स्काउट्स आणि गाईड्सचे अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वोच्च मानले जाणारे 'हिमालय वुड बैज' प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरित्या उत्तीर्ण केले आहे.
हे प्रशिक्षण दि.१३मे २०२६ ते १९ मे २०२६ दरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र ( एन. टी. सी.) पचमढ़ी (मध्यप्रदेश ) येथे पार पडले. या ७ दिवसीय निवासी शिबिरात त्यांना प्रगत नेतृत्व, आपत्कालीन व्यवस्थापन, आणि साहसी खेळांचे खडतर प्रशिक्षण देण्यात आले.भारत स्काउट्स आणि गाईड्स' अंतर्गत दिले जाणारे "हिमालय वुड बैज" हे युनिट लीडर्ससाठी (स्काउट, गाईड, रोवर किंवा रेंजर) असलेले सर्वोच्चस्तरीय प्रशिक्षण आहे.राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र (एन. टी. सी ), पचमढ़ी (मध्य प्रदेश) यामध्ये प्रगत नेतृत्व प्रशिक्षण, कॅम्पक्राफ्ट (शिबिर व्यवस्थापन), टेंट पिचिंग (तंबू उभारणी), मॅपिंग (नकाशा तयार करणे), आणि पायोनियरिंग प्रोजेक्ट्स यांचा समावेश असतो मैदानी अभ्यास: प्रथमोपचार, निसर्ग संवर्धन, हायकिंग, आणि समुदाय विकासाची कामे यावर विशेष भर दिला जातो. या यशस्वितेसाठी माध्यामिक शिक्षणाधिकारी मा. संजय क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे, जिल्हा संघटक डॉ. शंकर चामे, विजयकुमार शुक्ला (एल. टी. )मध्यप्रदेश, मनोजकुमार रॉय ( ए. एल. टी.) पश्चिम बंगाल, लक्ष्मण शुक्ला ( ए. एल. टी.) दिल्ली, विपिनकुमार मिश्रा (ए. एल टी.) उत्तरप्रदेश, नंदलालजी ए. एल. टी. राजस्थान ,सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे, सौदागर एच. एन. (ए. एल.टी.), पाटील धोंडीराम, राधाकिशन जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभले व सर्वांनी अभिनंदन केले.


0 टिप्पण्या