चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : नसरापूर येथे अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यातील स्वारगेट परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपीला कोणतीही सवलत न देता कठोरात कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी केली.
तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी शासनाने कडक कायदे आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या