Ticker

6/recent/ticker-posts

अड्याळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा - महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय पवनी (महसूल विभाग) च्या वतीने मंडळस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अड्याळ येथील गणेश सभागृह येथे नुकतेच जिल्हा झाले.
 कार्यक्रमाचे उदघाटन पवनीचे तहसीलदार सतीश साळवे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पवनीचे नायब तहसीलदार किशोर राऊत,मुख्याध्यापिका भारती गिरडकर,सरपंच शिवशंकर मुंगाटे,ग्राम विकास अधिकारी पौर्णिमा साखरे,माजी पंचायत समिती सभापती अर्चना देशमुख,पोलीस निरीक्षक धनंजय पाटील,माजी सरपंच मुन्नाभाऊ बोदलकर,छायाताई तलमले,अमोल उराडे, किशोर पंचभाई,पत्रकार विशाल रणदिवे,म.रा.पत्रकार संघाचे पवनी तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते.ह्याप्रसंगी सुजाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मान्यवरांचे नृत्य स्वागतगितानी स्वागत केले.शिबीर अभियानात स्टॉलच्या  माध्यमातून शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात आली.शेतकऱ्यांनी शासनाच्या यॊजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार भोंडेकर यांनी मार्गदर्शन करतांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सतीश साळवे यांनी केले. संचालन अड्याळचे मंडळ अधिकारी नत्थू  शेंडे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार चिचाळचे मंडळ अधिकारी गोविंद अंबुले यांनी मानले.कार्यक्रमाच्या  यशस्वितेकारिता ग्राम महसूल अधिकारी शरद गाढवे,सुमित चौकडे,निशा नागदेवे,मिना कळंबे,उपसरपंच शंकर मानापुरे जयदेव देशमुख,ईश्वर कुकसे,सचिन नंदनवार,राहुल खोब्रागडे,भूपेश मोटघरे त्याचप्रमाणे महसूल विभागाचे सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या