चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-पडसाळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. बालाजी नारायण फरड यांची तर व्हाइस चेअरमनपदी श्री. विजयकुमार भारत फरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
निवडीनंतर मावळते चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुतन चेअरमन बालाजी फरड व व्हाइस चेअरमन विजयकुमार फरड यांचा सत्कार सचिन दादा पाटील व रामचंद्र काका मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली तसेच पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या निवडीसाठी पडसाळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक दादासाहेब देशमुख, अण्णासाहेब मुटकुळे, तुकाराम सलगर, गणपत मुटकुळे, बिभीषण माळी, नारायण मुटकुळे, सौ. शारदा मुटकुळे, सौ. अनिता देशमुख व बाळू थोरात यांच्या शिफारशीने निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी माजी सरपंच दत्तानाना फरड, विद्यमान सरपंच योगेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब मुटकुळे, दत्तात्रय देशमुख, तात्यासाहेब फरड, विष्णू फरड, प्रविण पाटील, जयकुमार मुटकुळे, पिंटु सलगर, लक्ष्मण देशमुख, बालाजी मुटकुळे, प्रकाश पाटील, संजय मुटकुळे, सचिन फरड, रामदास फरड, सुग्रीव फरड, दत्तात्रय फरड, धनाजी फरड, सदाशिव फरड, अनुरथ पाटील, विलास देशमुख, सिध्देश्वर देशमुख, करण फरड व ओंकार फरड आदी मान्यवर उपस्थित होते.
निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून सौ. ललिता बागल मॅडम यांनी काम पाहिले. तसेच सचिव विलास चट्टे भाऊसाहेब व गुरुदेव अनभुले भाऊसाहेब यांनी निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.


0 टिप्पण्या