चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-पौनी तालुक्यातील अडयाळ येथील स्व.समीउल्लाह खान यांच्या शेतात सोनेरी _पिवळ्या फुलांनी बहावा वृक्ष बहरला आहे. बहावा वृक्ष हा अतिशय सुंदर वृक्ष असून याचे हिन्दी नाव अमलतास,शास्त्रीय नाव कैशिया फीस्तूला आहे.निसर्गाचा राजवृक्ष ,गोल्डन_ट्री म्हणुन ही हा ओळखला जातो. हा भरपूर ऑक्सिजन देतो,जमिनीची धूप थांबवतो व कार्बनशोषण करतो,जैवविविधता वाढवतो.उन्हाळ्यात हा शेतमजूर ,जनावरांना सावली देतो,मधमाश्या व पक्ष्यांना आश्रय देतो.पिवळ्या रंगाच्या लांब झुंबरासारखा खाली लटकणार्या मंजिर्या ,मे महिन्यात पूर्ण झाड पिवळ्या फुलांनी भरून जातो.शेंगा व फुल हरीण,पोपट,नीलगाय खातात. शोभा, सेवा व संवर्धन देणारा हा राजावृक्ष आहे. बहावा वृक्ष पर्यावरणीय संरक्षणाचा *जिवंत _पर्व*आहे.


0 टिप्पण्या