Ticker

6/recent/ticker-posts

युवक रुपेश कुत्तरमारे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर: समाजसेवेचा सन्मान


रा.से.यो.च्या माध्यमातून जनजागृती, वृक्षारोपण ते ग्रामविकास; 31 मे रोजी पुण्यात होणार गौरव


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती:-  आनंद निकेतन महाविद्यालयातील युवक रुपेश कुत्तरमारे यांची प्रतिष्ठेच्या “महाराष्ट्र भूषण” पुरस्कारासाठी निवड झाली आहे. समाजसेवा, युवकांमध्ये जनजागृती आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारंभ 31 मे 2026 रोजी पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, येरवडा येथे संपन्न होणार आहे. रुपेश यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

रुपेश कुत्तरमारे यांनी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, ग्रामस्वच्छता, पर्यावरण जनजागृती, आरोग्य शिबिरे, मतदार जनजागृती, प्लास्टिकमुक्त अभियान तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले. विशेष शिबिरांमधून गावविकास आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या यशाचे श्रेय रुपेश यांनी प्राचार्य डॉ. मृणाल काळे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश राठोड, डॉ. धनश्री पंचभाई, प्रा. मोक्षदा नाईक, डॉ. रंजना लाड, डॉ. नरेंद्र पाटील, प्रा. निरज आत्राम, मुंडे  तसेच वाणिज्य शाखेतील सर्व शिक्षकांना दिले आहे. 

“आई-वडिलांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळेच सामाजिक कार्यात पुढे जाण्याची ऊर्जा मिळाली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

या पुरस्कारामुळे कामाला अधिक प्रेरणा मिळाली असून भविष्यातही समाजहितासाठी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार रुपेश यांनी व्यक्त केला आहे.


-------------------------------
अभिमानास्पद! आनंद निकेतन महाविद्यालयातील रुपेश कुत्तरमारे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर. रा.से.यो.च्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृतीचे भरीव कार्य. 31 मे रोजी पुण्यात होणार सन्मान. अभिनंदन!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या