पत्रकार संघटनेची मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य  संघटक संजय भोकरे यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी आग्रही मागणी  पत्रकार संघाच्या तालुका शाखा पवनीच्या वतीने पवनी तहसीलचे तहसीलदार सतीश साळवे यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

   पत्रकार संघटनेचे राज्य संघटक तथा सांगली येथील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि दैनिक जनप्रवास चे संपादक संजय भोकरे  यांच्या हत्तेचा कट सांगली पोलिसांनी  नुकताच उधळून लावला आहे.या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल,चार जिवंत काडतूसं  आणि धारदार शश्त्रे जप्त केली आहेत.

  सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन   राज्याचे मुखमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजय भोकरे यांना तातडीने झेड प्लस  दर्जाचे पोलीस संरक्षण प्रदान करण्यात यावे,वर्षभरापूर्वी सिद्धार्थ भोकरे  यांना मिळालेल्या धमकीचा आणि आताच्या कटाचा आपसात काही संबंध आहे का यांची सखोल चौकशी करण्यात यावी,या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि या कटामागील मूळ बोलावता धनी कोण आहे याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या  निवेदनाच्या माध्यमातून  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पवनी तालुका अध्यक्ष जयेंद्र चव्हाण,तालुका संघटक प्रकाश हातेल, चिटणीस मोहन हरडे,उपाध्यक्ष बळीराम रघुते,उपाध्यक्ष महादेव शिवरकर,प्रसिद्धी प्रमुख विक्की पचारे,सदस्य प्रा.चरणदास बावणे,प्रदीप लोखंडे, नितीन वरगंटीवर यांनी केली आहे.