चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-कलाबाई कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय साकोली येथे वर्ग दहावीच्या व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत उज्वल यशाची परंपरा कायम राखलेली आहे. विद्यालयाचा वर्ग दहावीचा निकाल ८४.६१ % लागला असून कुमारी पूजा खेमराज खडके ७५.४० % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तसेच कुमारी कावेरी राकेश बारसागडे ७०.७२ % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकाविला. तर कुमारी ग्रीष्मा अशोक रंगारी या विद्यार्थिनीने ६८.८० % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. विद्यालयाचा वर्ग बारावीच्या परीक्षेचा एकूण निकाल ६९.६९ टक्के लागला असून कुमारी लक्ष्मी गोविंदा शेंडे ७२.६७ % गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम आलेली आहे. द्वितीय क्रमांक कुमारी खुशबू रवींद्र गोटेफोडे हिने ७१.५० % गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे तर कुमारी लकी विनोदसिंग बैस ७०.५० % गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थिनींच्या घरी जाऊन मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापिका कोठारे तसेच इतर शिक्षक शिक्षिका वृंद झिंगरे, जाधव कापगते भोयर, नगरकर नाकाडे हत्तीमारे कापगते, इंगळे, वैद्य, कठाने, शितल कुकडे, खिलेश उके, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


0 टिप्पण्या