पहाटे 5.30 वाजता घोडपेटजवळ सापळा; 4 ब्रास रेतीसह MH-40-CT-0223 हायवा तहसील कार्यालयात जमा
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी भद्रावती महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूरकडून येणारा 4 ब्रास अवैध रेतीने भरलेला हायवा ट्रक तहसीलदारांनी पहाटेच्या सुमारास पकडून तहसील कार्यालयात जमा केला.
शनिवार, 16 मे 2026 रोजी पहाटे 5.30 वाजता भद्रावती-चंद्रपूर महामार्गावर घोडपेट गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. MH-40-CT-0223 क्रमांकाचा हायवा ट्रक अवैधरित्या 4 ब्रास रेती घेऊन चंद्रपूरकडून येत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून वाहन ताब्यात घेण्यात आले.
सदर हायवा ट्रक रवींद्र कवडूजी उडान, रा. कान्होली बारा, नागपूर यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले.
तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी अनिल दडमल यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली. ग्राम महसूल अधिकारी राहुल भोंगळे, संदीप मुरकुटे, खुशाल मस्के, शुभम धात्रक व वाहनचालक बंडू बेलफुलवार यांच्या पथकाने कारवाई केली. जप्त वाहन पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
-----------------------------------
भद्रावती महसूल विभाग ॲक्शन मोडमध्ये! पहाटे 5.30 ला घोडपेटजवळ अवैध रेतीचा हायवा पकडला. 4 ब्रास रेतीसह MH-40-CT-0223 ट्रक जप्त. तहसीलदार राजेश भांडारकर यांची धडक कारवाई. अवैध रेती माफियांना दणका.


0 टिप्पण्या