Ticker

6/recent/ticker-posts

मोर्शी शहरमधे राष्ट्रीय डेंगू दिन निमित्य जनजागृति

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मोर्शी - राष्ट्रीय कितकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कोरडे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ शरद जोगी, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ जुनैद यांचे मार्गदर्शनाखाली मोर्शी शहरातील श्रीराम नर्सिंग कॉलेज येथे राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्या जनजागृती करण्यात येऊन माहिती देण्यात आली डेंगू आजार हा डासापासून होणारा आजार असल्यामुळे डासाच्या नियंत्रणासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, घर व घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, घरातील पाणी साठवण्याच्या भांड्यामध्ये लारवा होऊन न देणे, घरातील फुटके वस्तू, टायर यांची विल्हेवाट लावणे यासारखे उपाय योजना केल्यास डासावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
            यावेळी आरोग्य कर्मचारी विनय शेलूरे, प्रकाश मंगले, प्रशांत बेहरे, प्रीतम मांरोड़कर, नंदू थोरात, अक्षय शेवाळे, ऋषिकेश दहेकर, विनोद डहाके तसेच इतर सर्व कर्मचारी शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या