Ticker

6/recent/ticker-posts

पडेगाव येथील कचरा डेपो हटवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन!

विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; तात्काळ कारवाईची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)::-पडेगाव रोडवरील भीमनगर, भाऊसिंगपुरा भागातील 'ग्लोरिया सिटी' शेजारी असलेल्या कचरा डेपोला (डंपिंग ग्राउंड) लागलेल्या आगीमुळे आणि परिसरात पसरलेल्या विषारी धुरामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज डंपिंग ग्राउंडवर तीव्र आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका करुणा मेघानंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून या डंपिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर विषारी धूर पसरला असून, स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना श्वसनाचा त्रास, दम्याचे झटके, डोळ्यांची जळजळ यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी व स्थानिक नागरिकांनी केला आहे.

"कचरा डेपो हटवा, नागरिकांचे आरोग्य वाचवा!" अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. प्रशासनाने तात्काळ हा कचरा डेपो येथून हटवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात नगरसेविका करुणा मेघानंद जाधव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव, भावी गवई, प्रविण जाधव आणि परिसरातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या