चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-आदिशक्ति शीतलामाता महिला योग वर्ग भंडारा योग वर्गात योग साधीकांना MRP आंदोलन बाबत परिपत्रक देऊन अ. भारतीय ग्राहक पंचायत भंडारा कडून जिल्हा सचिव श्री.अनिल शेंडे यांनी MRP बाबद मार्गदर्शन करून गुगल फार्म भरण्या बाबत माहिती दिली .अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे दिल्ली येथे जंतर मन्तरवर दिनांक 12 जून 2026 रोजी एमआरपी विरोधात निदर्शन करण्यात येणार आहे, या निदर्शनाच्या समर्थनार्थ भंडारा येथे सकाळी 7.oo वाजता गांधी चौक येथे संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तसेच नगर कार्यकारिणी व इतर ग्राहक चळवळीतील मित्रांना घेऊन उपस्थित राहण्याची विनंती अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडाराचे जिल्हा सचिव श्री अनिल शेंडे यांच्या तर्फे करण्यात आली आहे.एमआरपी आंदोलना बद्दल पश्चिम क्षेत्र संघठन मंत्री दिल्ली श्री नितिनजी काकडे आणि विदर्भ आयटी सेल प्रमुख श्री चंद्रशेखर साठे हे सकाळी 6.00 ते 8.00 च्या दरम्यान पूर्ण भंडारा शहरात सायकल भ्रमण करत जनजागरण करीत आहेत. एमआरपी बाबत मार्गदर्शन करण्याचे ठिकाण गांधी चौक, बस स्टँड, त्रिमूर्ती चौक, मुस्लिम लायब्ररी चौक,मिस्कीन टॅन्क गार्डन, परत बहिरंगेश्वर मंदिर नंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे असे पत्रकात सांगून या बाबत शहरातील जागरूक नागरिकांनी ही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या