मुख्य संपादक ( दै.माझा मराठवाडा )दशरथ सुरडकर यांचे हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा - सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते रजत राऊत यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पत्रकारिता,राजकीय,अभिनय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार 2026 (सामाजिक क्षेत्र ) ने सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मान द्या सन्मान घ्या ह्या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्य (ता.9 जून 2026 ) रोजी सम्यक बुद्ध विहार पहेला येथे आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते रजत राऊत यांना त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन दै. माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांचे हस्ते माजी खासदार खुशाल बोपचे,अभिनेते अश्विनकुमार बघाले,अभिनेत्री चैताली भष्मे,गडचिरोली येथील प्रसिद्ध नृत्यांगना वैशाली मडावी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन जिल्हास्तरीय युवा पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले.
रजत राऊत यांना सामाजिक क्षेत्रातील जिल्हास्तरीय युवा पुरस्कार 2026 मिळाल्याबद्दल त्यांचे नंदगोपाल फौंडेशन चे संस्थापक,अध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार,सचिव अक्षय निमकर , आशिष वैद्य, संघरत्न उके, निखिल शेंडे , डॉ. हिरालाल निरगुडकर त्याचप्रमाणे मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या