Ticker

6/recent/ticker-posts

वन अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळाटाळ ?


अर्जदाराची नागपूर विभागीय कार्यालयाकडे तक्रार 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-मौजा गिरोला जपानी येथील गट नंबर १६० मधील सागवान व आडजात वृक्ष तोडीचा मुद्दा समोर आला आहे. वन समिती अध्यक्ष युवराज पर्वते यांच्या शेत सर्वे नंबर १६० मधील सागवान व आडजात वृक्ष तोडल्याची तक्रार दिनांक १४ मे २०२६ रोजी दाखल केली गेली. वनविभागाचे आर. एफ. ओ. यांनी मी कार्यावर रुजू झालो की कारवाई करतो असे सांगितले. प्रत्यक्षात आर. एफ. ओ. धनविजय यांनी कोणतीही कारवाई केली नाही. मला मंजुरी देण्याचा अधिकार आहे. माझ्या सहीने सदर झाडे तोडण्याची अनुमती दिली आहे असे सांगितले. २१ मे २०२६ रोजी अनुमती नाकारण्याचे पत्र दिले. अगोदर अनुमती द्यायची नंतर अनुमती नाकारणे हे कोणत्या वन कायद्यात आहे ?अर्जदाराने प्रसिद्धी माध्यमाला पुरविलेल्या बातमीनुसार, कास्तकाराने ७२ झाडे एकट्याने कापणे शक्य नाही. यापूर्वी सदर कास्तकाराने झाडे कापली आहेत का याची शहानिशा करावी. सदर कास्तकाराने वनविभागाच्या अनुमतीने झाडे कापली हे सत्य आहे. वनविभागाचे अधिकारी कास्तकारावर दबाव टाकून ठेकेदार व वनविभागाचे अधिकारी यांना मदत करत असल्याचे दिसून येत आहे. झाडे कापली नाही तर तक्रारदार याचेकडे स्टँप पेपर घेऊन कशासाठी आले हे त्यांनी स्पष्ट करावे. २७,०००  हजार रुपये आणि वरचे पैसे तुम्हाला परत देतो अशी भाषा का करत आहेत. खरोखर वृक्ष तोडीमध्ये त्यांचा संबंध नाही तर तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल करूनच दाखवावा असे आव्हान तक्रारदार यांनी केले आहे ? कास्तकाराने झाडे कापली तर १४ मे २०२६ पासून कस्तकारावर गुन्हा दाखल का केला नाही ? झाडे तोडण्याचे साहित्य जप्त का केले नाही ? या अगोदर यादव पर्वते यांनी केव्हातरी एवढी झाडे कापले का ? याची चौकशी करण्यात यावी. तालुक्यात अजून कोणत्या गावची झाडे तोडून परस्पर विक्री करत आहेत याची चौकशी वनविभागाने करावी. बरडकिन्ही, पारडी शिवारातील झाडे कापून परस्पर ट्रॅक भरून लाकडे कुणीआणि कुठे नेली ? सदर झाडे कास्तकार व सरकारी जागेतील आहेत अशी माहिती समोर आली आहे. याही प्रकरणाची चौकशी वनविभागाचे अधिकारी करतील की सेटिंग करून पांघरूण घालतील असा सवाल उपस्थित होत आहे. तक्रारदार यांनी डी. एफ. ओ. योगेंद्र शिंग, सी. सी. एफ. नागपूर यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. सी. सी. एफ.  नागपूर काय कारवाई करणार याकडे भंडारा जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या