Ticker

6/recent/ticker-posts

राजकारण तापले, भंडारा - गोंदिया विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट !

सातपैकी चार उमेदवारांची माघार! महाविकास आघाडीचे नरेश इश्वरकर यांना समर्थन!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : विधान परिषदेच्या भंडारा- गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून अखेरच्या क्षणी सातपैकी चार उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता रिंगणात महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर, अपक्ष नरेश ईश्वरकर आणि अपक्ष सचिन कुंभलकर हे तीन उमेदवार कायम आहेत.

नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोड यांनी नामांकन परत घेतले. ते रिंगणातून माघार घेण्याची शक्यता असल्याचे गुप्त मिळालेली आहे. आणि ही बातमी सोसल मिडीयावर सुदधा प्रकाशित झालेली आहे. या सोबतच, अपक्ष प्रफुल्ल अग्रवाल, तुमसरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, भास्कर रहांगडाले यांनी रिंगणातून माघार घेतली.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांनी माघार घेतल्याने या निवडणुकीतून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले आहे. ज्यांच्यावर काँग्रेसला भरवसा होता, त्या प्रफुल्ल अग्रवाल यांनीही नामांकन परत घेतले. मात्र अपक्ष उमेदवार जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांचे नामांकन कॉंग्रेसने कायम राखत ही निवडणूक अविरोध होण्यापासून टाळली. सर्वांची मते घ्यायची असल्याने आता महाविकास आघाडीचे समर्थित उमेदवार ईश्वरकर हे असतील, असे आमदार नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले. 

*पटोले यांचा भाजपवर दबावतंत्राचा आरोप*
नामांकन परत घेतल्यानंतर आमदार नाना पटोले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, भाजपा नेते दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप देखील केला आहे. नरेश ईश्वरकर यांनी नामांकन भरू नये, यासाठी सुरुवातीपासूनच त्यांच्याविरुद्ध - निनावी तक्रारींच्या बळावर दबाव आणला गेला होता. नामांकन परत घेण्याच्या आदल्या रात्रीही त्यांच्या अटकेचा प्रयत्न झाला.
या संदर्भात आपण जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षकांकडे आणि २ आयोगाकडे तक्रार केल्याचे पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी आमदार दिलीप बनसोड, प्रफुल्ल अग्रवाल - यांच्यासह नरेश ईश्वरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या