Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक पर्यावरणदिनी तथागत विद्यालय केसलवाडा येथे वृक्षारोपण

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-पवनी  तालुक्यातील अड्याळ केंद्रांतर्गत येत असलेल्या तथागत विद्यालय केसलवाडा येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ( ता.5) ला विद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

  5 जुन 2026 च्या जागतिक पर्यावरण दिनाची निसर्गापासून प्रेरित हवामानासाठी आपल्या भविष्यासाठी ही संकल्पना असून जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश पर्यावरणाच्या रक्षण व संवर्धनाबाबत जागतिक पातळीवर जनजागृती करणे आणि लोकांना सकारात्मक कृती करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. हा दिवस लोकांना निसर्गाची काळजी घेण्याची आणि भावी पिढीसाठी पृथ्वी सुरक्षित ठेवण्याची आठवण करून देतो.

 विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करतांना मुख्याध्यापक पद्माकर सावरकर,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण,लिपिक बी.एम.गजभिये,परिचर देवानंद देशमुख तसेच शंकर चंदनबावणे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या