मंडळ अधिकारी अनिल दडमल यांची धडक कारवाई;
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर:-भद्रावती तालुक्यातील चारगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने शुक्रवारी मध्यरात्री धडक कारवाई करत तस्करांना जबर धक्का दिला.
गोपनीय माहितीच्या आधारे 31 मे 2026 रोजी रात्री 11.45 वाजता विजासन परिसरात मंडळ अधिकारी अनिल दडमल व महसूल पथकाने सर्जिकल स्ट्राईक करत ही कारवाई केली.
चारगाव घाटावरून एक ब्रास रेती भरून येणारा बिना नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक MH CJ 4267 तपासणीदरम्यान पकडण्यात आला. चौकशीत रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
सदर ट्रॅक्टर भद्रावतीतील शिंदे लेआऊट येथील अमोल पोटे यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईनंतर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.
ही कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अनिल दडमल, खुशाल मस्के व ड्रायव्हर बंडू वेलफुलवार यांनी पार पाडली.
या धडक कारवाईमुळे परिसरातील रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून महसूल विभागाच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
भद्रावतीत महसूल विभाग सलग दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर दिसून आला असून अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
--------------------------------------------------------
"भद्रावतीत मध्यरात्री महसूल विभागाचा सर्जिकल स्ट्राईक! चारगाव घाटातून अवैध रेती नेणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडला. रात्री पावणेबारा वाजता मंडळ अधिकारी अनिल दडमल यांच्या पथकाने विजासन येथे कारवाई केली. अमोल पोटे यांचा ट्रॅक्टर जप्त. एक ब्रास रेती, पण परवाना नाही. तहसीलदार भांडारकर ॲक्शन मोडवर. सलग दुसऱ्या दिवशी कारवाई!"


0 टिप्पण्या